उमराने: लोहोणेर येथील शेतकर्याचा प्रामाणीकपणा उमराने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रत्ययास आला. शेतकरी सुखी तर जग सुखी या बाजार समितीच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच खरोखरच शेतकरी हा आपल्या कष्टाच्या पैश्यात सुखी समाधानी असून शेतकरी राजा हा सर्वांशी प्रमाणिक असल्याची प्रचिती पुन्हा एकदा आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी स्व निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे येथे बघायला आली. काल बाजार समितीत श्री प्रभाकर दादाजी अहिरे राहनार लोहोणेर या शेतकरी बांधवांनी माल विक्रीस आणलेला होता तो माल श्री अमोल दामू देवरे यांच्या आयुष पीयूष आडतीत लिलाव पद्धतीने विकला असता मालाच्या बदली संबंधित कॅशियर कडून १००००/- रुपये जास्तीचे दिले गेले. घरी गेल्यानंतर शेतकरी बांधवांने ती रक्कम मोजली असता शेतकरी बांधवांच्या रकमेत १००००/- हजार रुपये जास्त येत होते. त्या संबंधित शेतकरी बांधवांनी तात्काळ आज रोजी बाजार समितीत येऊन, लिलावाच्या ठिकाणी संबंधित आडतदार व्यापारी यांना त्यांची जास्तीची आलेली रक्कम परत केली. त्याप्रसंगी शेतकरी बांधवाचा बाजार समिती, व्यापारी असोसिएशन यांच्यातर्फे लिलावात सत्कार केला गेला व संबंधित शेतकरी बांधवाचे आभार मानले. या शेतकरी बांधवाचे इमानदारीचे सगळीकडून कौतुक होत आहे.
सह संपादक : समाधान महाजन (9503345333)