देवळा :
देवळा तालुक्यातील लोहोनेर येथील गिरणा नदी पात्रात बंद गोनित बकऱ्या बांधून त्या गीरणा नदीपात्रात टाकून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आरोग्य प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या 15 दिवसापासून अस प्रकार सुरू असून गेल्या 3-4 दिवसापूर्वीच 9 बकऱ्या गिरणा नदी पात्रातून सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेने काढल्या होत्या. सदरच्या बकऱ्या ह्या बंद गोनीत टाकल्याने नेमका असा प्रकार कोण करत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असे असतांनाच पुन्हा एकदा दिनांक 13 जून रोजी सायंकाळी पुन्हा पात्रात 3-4 बकऱ्या आढळून आल्या असून त्या बकऱ्या स्थानिकांनी बाहेर काढल्या आहेत. सदरच्या बकऱ्या ह्या बंद गोनीमध्ये बांधून टाकण्यात येत आहेत.
गिरणा नदीपात्रातून लोहोनेर व जवळपास च्या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. लोहोनेर गावात गिरणा नदीतून पिण्याचे पाणी टाकीत टाकून शुद्ध न करता थेट विहिरीच्या पाइपलाइन द्वारे नागरिकांना पुरविले जाते. अशा दूषित पाण्यातून गावात रोगराई पसरण्याची भीती परिसरातून व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घेऊन सदरचे गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन सदरचा प्रश्न तातडीने सोडविण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.
अशातच गेल्या कित्येक दिवसांपासून जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम बंद अवस्थेत असून जुनी टाकी देखील पाडण्यात आलेली आहे त्यामुळेच पिण्याचे पाणी नागरिकांना थेट पाइपलाइन द्वारे पुरविण्याची नामुष्की लोहोनेर ग्रामपंचायतीवर ओढवली आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत होत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम कंत्राट दाराकडून नेमके का बंद आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे.
लोकराज्य मराठी न्यूज
सह संपादक : समाधान महाजन