लोहोनेर : गेल्या 40 तासांपासून लोहोनेर शिवारातील खालप फाटा येथे विद्युत पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. खंडित झालेला वीज पुरवठा तत्काळ सुरू करणे आवश्यक असताना देखील सदरचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी कोणतेही काम विद्युत मंडळाने हाती घेतले नव्हते. याबाबत विद्युत मंडळाकडे विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी जनतेकडून केली जात होती. पण त्यांना मात्र उडवाउडवी ची उत्तरे दिली जात होती. याची दखल घेत लोकराज्य मराठी न्यूज ने आज दि 07 जुन रोजी सकाळी 10 च्या सुमारास वृत्त प्रसिद्ध करताच त्याची तात्काळ दखल घेऊन विद्युत मंडळाकडून तात्काळ जलदगतीने काम सुरू केले गेले असून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल.
लोकराज्य मराठी न्यूज.
सहसंपादक : लोकराज्य मराठी न्यूज