नाशिक :
केंद्र सरकारने मे 2024 अखेरीस सर्व रेशन कार्ड धारकांना आपली केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. तसेच संबंधित यंत्रणेस देखील तसे आदेश देण्यात आले होते. परंतु निवडणुकीमुळे सदरचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे आता e – kyc करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. E- kyc पूर्ण न केल्यास रेशन कार्ड वरील मिळणारे धान्याचा लाभ मिळणार नसल्याचे पुरवठा विभागाने सांगितले आहे.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देखील तालुका पुरवठा निरीक्षकांना e- kyc पूर्ण करण्या संबंधित आदेश देण्यात आले आहेत. अनेक कुटुंबात मयत व्यक्ती आहेत तसेच कुटुंबातील स्थलांतरित विवाहित महिलांचे नाव रेशन कार्ड मध्ये तसेच असून त्यांच्या नावे देखील धान्य वितरण सुरूच आहे. धान्य वितरणाची ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी सदरची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रेशन कार्ड मधील व्यक्तींनी आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन सदरची kyc प्रक्रिया पूर्ण करवून घेणे आवश्यक आहे. अन्यथा येत्या काळात सदरील व्यक्तींना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही.