नाशिक चे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची सेवापूर्ती आज समाप्त झाली.त्यांच्या सेवापुर्ती नंतर नाशिक च्या विभागीय आयुक्त पदी प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ प्रवीण गेडाम 2002 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (महाराष्ट्र केडर) रुजू झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध पदांवर काम केले आहे. एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी नाशिक, जळगाव, सोलापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी जळगाव जिल्यातील घरकुल घोटाळा प्रकरण हाताळले आहे. ते प्रकरण संपूर्ण भारतभर गाजले होते.
लोकराज्य मराठी न्यूज
मुख्य संपादक : चेतन परदेशी