लोहोणेर :
लोहोनेर येथील पार्वतानंद लॉन्स” येथे २ जुन २०२४ रोजी २६ वर्षानतंर प्रथमच मोठ्या संख्येने माजी विदयार्थी एकत्रित आले. या स्नेहमेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक बी. बी. जाधव, एन जी शेवाळे, एस.टी.मोरे, एस. एस.शेवाळे, आहेर मॅडम व बच्छाव मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती स्तवन,प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी शिक्षकाचा भव्य व यथोचित सन्मान करण्यात आला. शिक्षकांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातुन राष्ट्रप्रेम, देशभक्ती, आई-वडीलांचा आदर तसेच आपल्या पाल्यावर करावयाचे संस्कार,आदर्श जीवन जगण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश देशमुख व प्रमिला पवार यांनी अतिशय प्रभावीपणे केले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती जाधव यांनी केले. सतिश निकम यांनी शालेय परीपाठ घेतला. तसेच किशोर सोनवणे, मनिषा देवरे, सिमा अहिरे व शक्तीदादा महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजन समिती ने शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थाना शालेय साहीत्य (वही) वाटप करण्याचा निर्णय घेतला.
कार्यक्रम यशस्वि पार पाडण्यासाठी अरुण उशिरे, महेश देशमुख, सचिन धामणे, दिलीप पवार, सागर धामणे, त्र्यंबक बागुल, विलास जाधव, किशोर सोनवणे, निलेश गवळी व इतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.सचिन धामणे यांनी आभार व्यक्त केले.बऱ्याच काळानंतर एकमेकांना भेटल्यानंतर सर्व्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता. सर्वांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सहसंपादक : समाधान महाजन