लोहोनेर – देवळा तालुक्यातील लोहोनेर गावातील व परिसरातील जीवन दायिनी असलेल्या गिरना नदी पात्रातून भर दिवसा वाळू उपसा केला जातोय. गेल्या अनेक दिवसांपासून लोहोनेर गावातील नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. सदरचा वाळू उपसा रोखण्यात मात्र महसूल व पोलीस प्रशासन मात्र पूर्णतः अपयशी ठरले आहे. दोन वर्षांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी माननीय शहाजी उमाप यांची नियुक्ती झाल्यानंतर मात्र वाळू उपसा पूर्णता बंद करण्यात पोलीस विभागाला यश आले होते परंतु त्यांची बदली होतात देवळा तालुक्यातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील वाळू उपसा जोमाने सुरू झाला. लोहोनेर गिरणा नदी पात्रातील वाळू उपसा बंद करण्यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार करूनही वाळू उपसा बंद करण्यास प्रशासन पूर्णता अपयशी ठरले आहे असाच वाळू उपसा सुरू राहिल्यास परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. अधिकारी बदलताच वाळू उपसा कसा सुरू होतो याबद्दल ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली आहे . वाळू उपसा नेमका कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने व का सुरू आहे तसेच त्याकडे प्रशासन का दुर्लक्ष करते आहे असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत.
हा सगळा बाजार हफ्ते वसुलीवर सुरू असल्याची चर्चा गावातील संतप्त नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. गिरणा नदी पात्रात पडून असलेले वाळू डेपो तसेच गिरणा नदीपात्रातून वाळू तस्करी करत असलेल्या तस्करांचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नासिक ग्रामीण पोलीस दलाचे माजी पोलीस अधीक्षक उमाप साहेब यांचे कार्यकाळात ज्याप्रमाणे वाळू उपसा बंद होता त्याचप्रमाणे आता देखील वाळू उपसा बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. देवळा पोलिसांनी यापूर्वी अनेक वाळूचे ट्रॅक्टर जमा केले होते व त्यांचेवर कार्यवाही देखील केली होते. परंतु गेल्या 7-8 महिन्यापासून मात्र याबाबत देवळा पोलिसांनी नमती भूमिका का घेतली आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. या संपूर्ण प्रकरणात आता पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
सह संपादक : समाधान महाजन
लोकराज्य मराठी न्यूज