नाशिक
नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर हे मे 31 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे नाशिक पोलीस परिक्षेत्राचे पद रिक्त झाले. त्यांच्या जागी आता आयपीएस रंजन कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी आयपीएस रंजन कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शर्मा यांनी यापूर्वी पोलीस खात्यात जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक, सी.आय. डी विभातील पोलीस अधीक्षक हे पद सांभाळले आहे.
भारतीय पोलीस सेवेतील 2006 च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. 2012 मध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. तदनंतर काही काळ नागपूर येथे काही कालावधी कार्य करून तेथून त्यांची बदली होऊन अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून 2 वर्ष चांगले कामकाज केले. त्यावेळी त्यांनी नगर जिल्ह्यातील कुख्यात गुंडांना वठणीवर आणले होते. आपल्या दिमाखदार कामगिरी साठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा नाशिक परिक्षेत्राला नक्कीच फायदा होईल.
लोकराज्य मराठी न्यूज.
मुख्य संपादक : चेतन परदेशी