लोहोणेर येथील खालपफाटा शिवार येथे गेल्या ४०तासांपासुन विद्युत पोल वार्याने पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे मात्र महावितरणाचे अधिकारी हे कंत्राटदार नसल्याचे कारणं देत कुठल्याही प्रकारचे कामकाजाची जबाबदारी घेताना दिसत नाही .आजरोजी खालपफाटा शिवारातील शेतकर्यांच्या घरांमध्ये देखील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे तसेच पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा देखील निर्माण झाला आहे तसेच सदर शिवारात बिबट्याचे स्थान असल्यामुळे विद्युतपुरवठा नसल्याकारनाने शेतकर्यामध्ये भितीचे वातावरनं निर्माण झाले आहे सदर विद्युत पुरवठा त्वरीत सुरू करण्यात यावे अशी येथील शेतकर्यांची मागणी आहे.