देवळा तालुक्याचे विकासपुरूष म्हणुन संबोधले जाणारे केदा नाना आहेर यांचा आज 27ऑगस्ट 2024 रोजी वाढदिवस आहे.
केदा नानांबद्दल सांगायचे झाल्यास नानांची सुरवात 32व्या वर्षी देवळा गावाच्या सरपंच पदापासुन झाली तदनंतर1995 साली देवळा तालुक्याची निर्मिती झाल्यापासुन देवळा शहरासाच्या विकासासाठी नानांच्या माध्यमातुन अनेक विकासकामे करण्यात आली त्यात खर्या अर्थाने देवळा शहरात भुतो ना भविष्य असे शिवस्मारकाची निर्मिती नानांच्या माध्यमातुन करण्यात आली.
केदा नानांनी आपली विकासाची दौड देवळा शहरापुर्ती मर्यादित न ठेवता तालुक्यातील गावागावात आपली विकासकामे प्रस्थापित केली त्याकरता नानांनी लोहोणेर जि.प.गटातुन सदस्य निवडणुक लढवुण तेथेच न थांबता जि.प.कृषी तथा पशुसंवर्धन सभापती पद देखील भुषिवले. केदा नानांनी आजपावेतो अनेक पदे भुषिवली त्यात सरपंच,जि.प.सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,जि.सह.बॅक अध्यक्ष,भाजपा जिल्हाध्यक्ष,केंद्राच्या नाफेड संचालक पदापर्यंत नानांची घोडदौड चालुचं आहे.
शेतकरी वर्गासाठी शेतीविषयी उपक्रम राबवता यावे याकरता देवळा ॲग्रोची देखील निर्मिती केदा नानांनी केली.
आजरोजी केदा नानांची स्वप्नपुर्ती चांदवड-देवळा विधानसभा 2024 चे लवकरचं पुर्णत्वःत व्हावे अशी संपुर्ण तालुक्यातील जनतेची ईच्छा आहे त्यामुळे तालुक्यातुन आज वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा,आशिर्वाद सह नानांच्या विधानसभा उमेदवारीची देखील मागणी नागरीक करतं आहेत.संपुर्ण देवळा तालुक्यात केदा नानांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सह भावी आमदार उल्लेखांचे बॅनर लावण्यात आले आहेत.केदा नानांच्या वाढदिवसानिमित्त आज देवळा शहराहसह तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
केदा नानांच्या सर्व ईच्छा आकांक्षा पुर्ण होवोत आमच्या लोकराज्य न्युजच्या पुर्ण टिमकडुन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
सह संपादक : समाधान महाजन