नाशिक : नुकतीच मार्च महिन्यात राज्य शासनाकडून 17500 पदांच्या भरतीची जाहिरात दिली गेली होती. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमुळे भरती प्रक्रिया काही काळ स्थगित होती. परंतु सदरची भरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. राज्यभरात मैदानी चाचणी संपल्यानंतर संपूर्ण राज्यात एका घटकासाठी एकाच दिवशी ऑफलाईन पद्धतीने पेपर घेण्याचे नियोजन शासनाने केल्याचे समजते.
आगामी काळात पावसाळा असल्याने मैदानी चाचणी घेण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये मात्र अडचण निर्माण होऊ शकते. असे असले तरी देखील अनेक जिल्ह्यात मैदानी चाचणी ही 10 जून पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणात अधिक पाऊस असल्याने मुंबईसह कोकणातील इतर जील्हातील मैदानी चाचणी चे वेळापत्रक मात्र कोलमडू शकते. असे होऊ नये म्हणून त्यावर पर्यायी मार्ग काढण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दल, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय, धुळे, जिल्हा पोलीस दल, रत्नागिरी जिल्हा पोलीस दल, लातूर जिल्हा पोलीस दल, ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दल, तसेच राज्य राखीव पोलीस बलाच्या अनेक घटकांमध्ये मैदानी चाचणी ची पूर्व तयारी पूर्ण झाली असून लवकरच मैदानी चाचणी सुरू होण्याचे संकेत आहेत.
लोकराज्य मराठी न्यूज,
सह संपादक : समाधान महाजन