नाशिक :
“योगी बनो, सहयोगी बनो, समाज के लिए उपयोगी बनो.” हे ब्रीद वाक्य असलेल्या अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, नवी दिल्ली तसेच भारतीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय योग वीर सन्मान/ पुरस्कार येत्या काही दिवसांत श्री. राम ऑडिटोरियम अयोध्या (उ.प्र.) येथे केंद्रीय मंत्री, योगगुरू व मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात येणार आहे.श्री.सुनिल देवरे सर यांनी क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भरिव योगदान दिले आहे.अर्थिक दृष्टीने गरीब पण बौद्धिक दृष्ट्या सक्षम खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षण व खेळाचा मार्ग सुकर करून दिला आहे.वडीलांच्या स्मरणार्थ अनेक संस्थेत शै. साहित्य वाटप केले आहे.सरांनी योग शिक्षकाची पदवी घेतल्यानंतर शासकीय, शालेय व सार्वजनिक ठिकाणी योगाचा प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला आहे.याची दखल घेत अ. भा.योग शि.महासंघ, नवी दिल्ली या संस्थेने सरांची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड केली आहे.सरांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.