देवळा : देवळा तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या आर्मी व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र असलेल्या अश्वमेध करिअर अकॅडमी मधून दरवर्षी अनेक विद्यार्थी यशस्वी होतात. सन 2022- 23 च्या पोलीस भरतीतही अश्वमेध करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. पोलीस भरतीच्या पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षा 07 जुलै रोजी संपन्न झाली. त्याचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यामध्ये तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून त्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम देवळा येथील शिवस्मारक येथे पार पडला. देवळा तालुक्यातील नेते माननीय संभा दादा आहेर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत राहुल सोनवणे , अतुल जाधव , रोहित जाधव, भामरे राकेश, आहेर शिवानी, केदारे सानिका , सिसोदे खुशबू, गांगुर्डे ऋतुजा,ई. ची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली. शिवस्मारक येथील सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी तसेच अश्वमेध करिअर अकॅडमीचे संचालक चेतन परदेशी (सर) यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या समयी अकॅडमी चे संचालक परदेशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सांगितले की ग्रामीण भागात कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोलीस व सैन्य दलात भरती करण्याचा त्यांचा मानस आहे.
सहसंपादक
समाधान महाजन