दिनांक 01 जून रोजी लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर आज सायंकाळी सर्वच न्यूज चॅनल कडून एक्झीट पोल दाखविण्यात येतोय.अनेक ठिकाणी नवख्या चेहऱ्यांना भाजप व इतर पक्षाकडून संधी देण्यात आली होती. अनेक ठिकाणी हे नवखे चेहरे बाजी मारताना दिसत आहेत. दिंडोरी मतदार संघात देखील लोकसभेची निवड अत्यंत चुरशीची ठरली. दिंडोरी लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री भारती ताई पवार यांना भाजपाने उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून भगरे सरांना उमेदवारी देण्यात आली होती. गेल्या 20 -25 वर्षापासून या मतदार संघात भाजपचेच वर्चस्व होते. परंतु कांदा प्रश्नावरून मात्र ठिकठिकाणी भारती ताईंना मोठ्या प्रमाणात रोषास सामोरे जावे लागले होते. याचाच फायदा भगरे सरांना झालं असल्याचे बोलले जात आहे. गेल्या 5 वर्षात केंद्रीय मंत्रिपद असूनही मतदार संघात काम झाले नसल्याचे मतदारांचे म्हणणे होते. मतदार संघात मतदारांनी भगरे सरांना अधिक पसंती दिली असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. एक्झीट पोल नुसार देखील भारती पवार पिछाडी वर असून भगरे सर विजयी होतील असा अंदाज वर्तवला जातोय. तसेच अनेक राजकीय विश्लेषकांनी सांगितल्या प्रमाणे भाजपला आपला गड गमवावा लागणार यात मात्र शंका नाही. भारती ताई या जनतेपर्यंत पोचाण्यात अपयशी ठरल्या असून मतदारांना आता लोकसभेसाठी नवख्या असलेल्या भगरे सारांकडून मतदार संघाच्या विकासाची अपेक्षा आहे.
नाशिक :
लोकराज्य मराठी न्यूज,
सहसंपादक : समाधान महाजन .
.