नाशिक : नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पालीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सटाणा तालुक्यात मोटर सायकल चोरी करणारे दोन संशयीतांना ताब्यात घेऊन मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे.
दिनांक १०/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सटाणा शहरात मोटर सायकल चोरी करणारे गुन्हेगार हे धुळे जिल्हयातील साकी परिसरात असल्याचे खात्रीशीररित्या समजल्याने, पोलीस पथकाने साक्री तालुक्यातील लामकनी बसस्थानक परिसरातुन संशयीत नामे १) प्रदिप भरत पाटील, वय २५, रा. लोनखेडी, ता. साक्री, जि. धुळे, व २) मनोज पांडुरंग गायकवाड, वय २८, रा. लामकनी, ता.जि. धुळे यांना ताब्यात घेतले. त्यांचे कब्जात मिळून आलेली बजाज प्लॅटीना मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विवारपुस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी साथीदार नामे ३) भुषण सुरेश मोहिते, रा. लोनखेडी, ता. साकी, जि. धुळे अशांनी मिळून सदरची
मोटर सायकल डांगसौंदाणे, ता. सटाणा येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेले आरोपींना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी सटाणा, देवळा, जायखेडा परिसरातुन ०३ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींचे कब्जातुन चोरीच्या ०३ बजाज प्लॅटीना मोटर सायकल व मोबाईल फोन असा एकुण किं. रु. १,१५,०००/- रूपये किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून देवळा, सटाणा व जायखेडा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे एकुण ०३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
यातील आरोपींचा साथीदार नामे भुषण सुरेश मोहिते, रा. लोनखेडी, ता. साकी, जि. धुळे हा कळवण पोलीस ठाणेकडील मोटर सायकल चोरीचे गुन्हयात अटक असून वरील आरोपी प्रदिप पाटील व मनोज गायकवाड यांना गुन्हयाचे पुढील तपासकामी सटाणा पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचे तपासात यातील आरोपींकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री. राजु सुर्वे, पोउनि दत्ता कांभीरे, पोहवा प्रशांत पाटील, सुधाकर बागुल, योगेश शेवाळे, पोना सुभाष चोपडा, दत्ता माळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने मोटर सायकल चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.
लोकराज्य मराठी न्यूज.
सहसंपादक : समाधान महाजन