नाशिक :
18 व्या लोकसभेचे निकाल आज दि. 04 जून रोजी हाती आले.यामध्ये भाजपला निराशाजनक आकड्यांवर समाधान मानावे लागले. मोदींनी या लोकसभेत तर 400 पार चा नारा दिला होता. पण आता मोदींना तर 300 चा आकडाही पार होतांना दिसत नाहीये. एक्झीट पोल मध्ये बिजेपी एक हाती सत्ता मिळवेल असे वाटत होते परंतु संपूर्ण भारतभर मात्र मतदारांनी भाजपच्या अनेक उमेदवारांना आपली ताकत दाखवून दिली. संपूर्ण भारतभर मोदींनी अनेक सभा घेतल्या. महाराष्ट्रात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा यांनी पायपीट केली मात्र तरी देखील त्यांना महाराष्ट्रातून मात मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय नाट्य घडामोडी घडल्या. पक्ष फोडाफोडीचे राजकारण झाले पण जनतेने मात्र त्यांना आपली जागा दाखवून दिली. आगामी काळात महाराष्ट्रात विधान सभेच्या निवडणुका प्रस्तावित आहे. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून भारतीय जनता पार्टी काय धडा घेते हे मात्र आता पहावे लागेल.
भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी अयशस्वी ठरताना दिसतेय. त्यांना आता मित्र पक्षांशी हात मिळवणी करणे गरजेचे आहे. आता मित्र पक्षच भाजपला सत्ता स्थापनेत मदत करतील. मित्र पक्षांनी हर इंडिया आघाडीकडे उडी घेतली तर मोदींना सत्ता स्थापनेपासून दूर राहावे लागेल.
मुख्य संपादक : चेतन परदेशी, लोकराज्य मराठी न्यूज